पत्रकार विवेक (राजू) परब यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून अनोखा सन्मान…

⚡मालवण ता.२१-: चिंदर गावातील अनुलोम वस्तीमित्र पत्रकार विवेक(राजू)परब यांना अनुलोमचे प्रमुख मार्गदर्शक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास अयोध्येहून मागवलेली प्रभू श्री रामांची धनुर्रधारी मूर्ती सिंधुदुर्ग-रत्नागिरी, अनुलोम उपविभाग जनसेवक रवींद्र भोंवड व कारसेवक विलास हडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.दिंडी काढून भक्ती भावाने रामनामचा जयघोष करीत मूर्ती दत्त मंदिरात आणली गेली.सुहासिनीनी श्री राम मूर्तीचे औक्षण केले….

Read More

माऊली व जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळातर्फेआम.नितेश राणे यांचा सन्मान…

⚡कणकवली ता.२१-: माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाच्यावतीने आम. नितेश राणे यांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, व संलग्न मित्र मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी आम. नितेश राणे यांनी…

Read More

बांदा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या विकास अध्यक्षपदी बाळु सावंत यांची निवड…

⚡बांदा ता.२१-: बांदा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या (विकास) अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपचे नेते राजाराम उर्फ बाळु सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष घनश्याम बांदेकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. आज झालेल्या मासिक सभेत उपाध्यक्षपदी कार्यरत आलेले श्री सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष घनश्याम बांदेकर, संचालक…

Read More

कणकवलीत २७ ते२८ जानेवारीला होणार सम्यक साहित्य कला संगिती…

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीने केले आयोजन.. ⚡कणकवली ता.२१-: अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने दुसरी सम्यक साहित्य कला संगिती कणकवली येथील मराठा नाट्यगृह येथे आ. सो. शेवरे साहित्यनगरी येथे 27 आणि 28 जानेवारी रोजी संपन्न होणार असल्याची माहिती अपरांत साहित्य कला प्रबोधिनीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, कार्याध्यक्ष अनिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. अध्यक्षस्थानी…

Read More

उद्धव ठाकरे, राऊत यांचे अयोध्या राम मंदिरसाठी योगदान असल्याचा एकतरी पुरावा द्या…

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचे आव्हान:देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पाहून आम्हाला अभिमान वाटत ⚡कणकवली ता.२१-: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रखर रामभक्त आणि प्रखर हिंदुत्ववादी आहेत,त्यांनी अयोध्येला जाऊन कार सेवा दिली. याचा आम्हाला अभिमान आहे.मात्र सातत्याने राम मंदिरावर टीका करणारे,भाजप नेत्यांवर आणि कार सेवकांवर बोलणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे अयोध्या राम मंदिरसाठी योगदान…

Read More

आपल्या रामाची प्रतिष्ठापना होत आहे याचा आनंद सर्वांना असायला पाहिजे…

केंद्रीय मंत्री नारायण राणे:वेंगुर्ला सातेरी मंदिर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हस्ते स्वच्छता अभियान संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.२१-: देशभरात अयोध्येच्या राममंदिरचीच चर्चा आहे. लोक भारावून गेले आहेत. ५०० वर्षांत जे शक्य झाले नाही ते आता २०२४ मध्ये शक्य झाले. हा वेगळा आनंद आहे. एक समाधान आहे. इथे पक्ष, जात, धर्म याचा प्रश्न नाही. आपल्या रामाची…

Read More

नमो चषक स्पर्धे अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते उदघाटन…

⚡सावंतवाडी ता.२१- : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बंटी पुरोहित, कौस्तुभ पेडणेकर, किरण सावंत, श्रीकृष्ण आडेलकर, प्रवीण सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.

Read More

सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवरील दंडवतेचे तैलचित्र लावण्यास रेल्वे प्रशासनाचाविरोध…

फोटो काढल्यास जशासतसे उतर देऊ:कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेचा इशारा.. ⚡सिंधुदुर्गनगरी २१-: कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांच्यातील चित्राचे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर त्यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त तैलचित्राचे अनावरण पूजन केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने असे तैलचित्र लावणे योग्य नसल्याचे व सदर चा फोटो काढण्याबाबत केलेल्या विरोधाला सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटनेने कडाडून विरोध करून दडवेतेच्या तैलचित्राला विरोध का? जर…

Read More

निवृत्त शिक्षकांनी संघटनेस बळ द्या…

सावळाराम अणावकर:प्राथमिक शिक्षकांचे रजा काळातील रजा रोखीकरण होणारच.. ⚡वेंगुर्ला ता.२१-: संघर्ष करण्यासाठी संघटनेची आवश्यकता असते. सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन संघटनेस बळ द्या. मग सर्व प्रलंबित प्रश्न आाम्ही निश्चित सोडवू. प्राथमिक शिक्षकांचे रजा काळातील रजा रोखीकरण होणारच असा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी उपस्थितांना दिला.

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना मिळाले गणित प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.२१-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना गणित प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश प्राप्त झाले. या परीक्षेत एकूण एकोणीस विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यातील सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये, इयत्ता पाचवी मधील कु. हेरंब शामसुंदर नाटेकर, कु. सोहम सचिन देशमुख, कु. श्री तुषार कोरगावर, कु. सायना श्रीराम अळवणी, कु. स्पृहा अमेय आरोंदेकर, कु. अस्मि धीरज सावंत या…

Read More
You cannot copy content of this page