बाळासाहेब ठाकरे स्मारकाला हात न लावता नळ योजना फिल्टरेशन प्लांट बसवा…

अन्यथा योजनेला तीव्र विरोध होईल:
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा

सावंतवाडी ता.१६-:येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणावर नवीन नळ पाणी योजनेतील फिल्टरेशन प्लांट च्या लाईन आऊट मध्ये त्या ठिकाणी असलेले कल्पवृक्ष रुपी कै. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक येत असल्याने सदरचे स्मारकाला हात लावल्यास तीव्र विरोध करण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालिका प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

श्री साळगावकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात पाळणे कोंड धरणावर ब्रह्मा विष्णू महेश अशा स्वरूपात तीन नारळाची झाडे एकत्र लावून कै.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक म्हणून तेथे भावना जोडल्या होत्या. दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला श्री साळगावकर हे आजी-माजी शिवसैनिकांसोबत त्या ठिकाणी नतमस्तक होतात नव्याने 56 कोटी रुपयांची नळ पाणी योजना या पाळणे कोंड धरणावर मंजूर झाले असून त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या फिल्टरेशन प्लांटच्या आराखड्यात लाईन आऊट मध्ये सदरचे स्मारक येत असल्याचे श्री साळगावकर यांच्या कानावर पडले आहे दरम्यान साळगावकर यांनी सदरच्या स्मारकाला कोणताही हात न लागता फिल्टरेशन चे काम कसे करता येईल यासाठी चर्चा करून मार्ग काढावा स्मारकाला हात लावल्यास आपण सहन करणार नाही प्रसंगी तीव्र विरोध करू असा इशाराही त्यांनी दिला आहे

You cannot copy content of this page