अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल…

⚡कणकवली ता.१५-: मंगला जाधव व शरदचंद्र जाधव या माय-लेकाच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक वेदांत जयवंत शेलार (२५, पाडगाव कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर धूम ठोकलेल्या कार चालकास फोंडाघाट येथे पोलीस काॅस्टेबल सचिन माने व पांडुरंग कळंत्रे यांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले.


मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता क्रॉसकरीत असताना मंगला व शरदचंद्र यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. यात दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली-गाठवणवाडी येथे रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला होता. अपघातानंतर कारचालकाने धूम ठोकली होती. अपघातग्रस्तांना ग्रामस्थांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. शरदचंद्र जाधव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अपघातनंतर धूम ठोकलेल्या चालकास फोंडाघाट येथे पोलिसांनी पकडून त्याच्या ताब्यातील रोनॉल्ट डस्टर (एमएच ०३ बीएस ४४८०) ही कार ताब्यात घेतली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व पोलीस काॅस्टेबल किरण कदम यांनी सदर कार व चालकाला पोलीस ठाण्यात अाणले. अपघातप्रकरणी आनंद बाबी जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार वेदांत शेलार याच्या विरोधात 304 ए, 279, 337, 338, एमव्ही अॅक्ट 184 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.. याबाबत अधिक तपास कणकली पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page