वादग्रस्त पोस्ट शेअर करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना घेतले ताब्यात…

पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची माहिती:रात्री उशिरा न्यायालयात करणार हजर.. ⚡सावंतवाडी ता.२४-: वादग्रस्त पोस्ट शेअर करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. यात एक युवक दोन युवती तसेच दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे त्याला रात्री उशिरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. याबाबतची माहिती अशी की सावंतवाडी…

Read More

मालवण महसूल नायब तहसीलदार पदी श्रद्धा चौगुले यांची नियुक्ती…

मालवण ता.२४-: मालवण तहसील कार्यालय येथील महसूल नायब तहसीलदार पदी श्रद्धा महादेव चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2020 एमपीएससी बॅच च्या श्रद्धा चौगुले या इंजिनियर असून राष्ट्रीय खोखो खेळाडू आहेत. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर असून त्यांचे सर्व शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांची नियुक्ती मालवण महसूल नायब पदावर परिवेक्षाधीन कालावधीत झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारत…

Read More

मालवण गटविकास अधिकारी पदी आत्मज मोरे यांची नियुक्ती..

⚡मालवण ता.२४-: मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी गट अ पदी आत्मज मोरे (महाराष्ट्र विकास सेवा गट अ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2020 च्या एमपीएससी बॅच चे आत्मज मोरे यांनी परिविक्षाधीन कालावधीत सहाय्यक गटाविकास अधिकारी म्हणून मुरुड रायगड या ठिकाणी सेवा बजावली. त्यांचे मूळ गाव कराड सातारा आहे. ते मॅकॅनिकल इंजिनियर आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम…

Read More

सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद…

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन:९० नागरिकांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया… ⚡कणकवली ता.२४-: शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख तथा जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज संपन्न झाले. यामध्ये कणकवली आणि मालवण तालुक्यातील ९० नागरिकांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातील काही जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला….

Read More

न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ‘वेताळ करंडक २०२४‘ चे मानकरी…

⚡वेंगुर्ला ता.२४-: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध महोत्सवांतर्गत पूर्व प्राथमिक शाळा व इयत्ता पाचवीपासून पुढील शाळांसाठी विविध स्पर्धा सलग दहव्या वर्षी संपन्न झाल्या. शाळांसाठी समूहगीत गायन, एकेरी नृत्य, प्रश्नमंजुषा, समूहनृत्य, दशावतार साभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या पाच स्पर्धांमधून अव्वल ठरत मानाचा वेताळ करंडक न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा यांनी पटकावला. तर पूर्व पाथमिक…

Read More

भविष्य घडविण्यासाठी वाचनालयांचा वापर करा…

काशिनाथ सामंत:नगर वाचनालय, वेंगुर्ला यांच्यातर्फे पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न .. ⚡वेंगुर्ला ता.२४-: विद्यार्थ्यांनी सभ्यता, शिस्तबद्धता जोपासली पाहिजे. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो. स्पर्धा ही जीवनात आवश्यक गोष्ट आहे आणि त्याला आपण सामोरे गेले पाहिजे. वाचनालये ही आपली संस्कृती समृद्ध करण्याचे साधन आहे. त्याचा प्रत्येकाने आपले भविष्य घडविण्यासाठी वापर केला पाहिजे असे उद्गार कुडाळ…

Read More

युवा मोर्चा आयोजित नमो चषक जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नाना गावडे यांनी विजेतेपद पटकावले…

⚡सावंतवाडी ता.२४-:तळवडे येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषक २०२४ जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नाना गावडे मित्र मंडळ तळवडे यांनी विजेतेपद पटकावले तसेच सिद्धिविनायक राईवाडी कुडाळ संघाला उपविजेेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले रात्री उशिरापर्यंत चाललेली ही स्पर्धा शेवटच्या क्षणी रंगतदार ठरली जिल्ह्यातून एकापेक्षा एक असा…

Read More

टर्मिनसचा प्रश्न काही राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी १६ वर्षे तिष्ठत ठेवला…

बबन साळगावकर यांचा आरोप:२६ जानेवारीला टर्मिनससाठी होणाऱ्या आंदोलनाला सर्वपक्षीय जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न काही राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी १६ वर्षे तिष्ठत ठेवला, असा आरोप सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. दरम्यान २६ जानेवारीला टर्मिनससाठी होणाऱ्या आंदोलनाला येथील सर्वपक्षीय जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कै. जयानंद मठकर…

Read More

प्रोत्साहन अनुदानसाठी शेतकरी अभय आजगावकर यांचे 26 रोजी आमरण उपोषण…

⚡बांदा ता.२४-: महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अजूनही काही पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला नाही. सदर प्रोत्साहन अनुदान देण्यात शासन टाळाटाळ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर इन्सुली येथील शेतकरी अभय विश्वनाथ आजगावकर यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा…

Read More

रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये…

रुपेश पावसकर;आपण सर्वतोपरी सहकार्य करणार ;शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता.. ⚡कुडाळ ता.२४-: शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता श्री.मनोज जोशी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता यांनी मेडिकल कॉलेज मधील समस्या श्री.रुपेश पावसकर यांना सांगितल्या त्यांचे निवारण आपण मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे माध्यमातून पूर्ण करू असे आश्वासन श्री.रुपेश…

Read More
You cannot copy content of this page