विविध स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेचे यश…

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला येथील राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी सन २०२३-२३ मध्ये झालेल्या विविध स्पर्धा परिक्षांमध्ये बाजी मारली आहे. सिधुदुर्ग जिल्हा परिषदतर्फे इयत्ता चौथीसाठी आयोजित एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतून बसलेले सर्वही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात यशिका पांडुरंग माडये ही वेंगुर्ला तालुक्यात पाचवी आली.

  फेब्रुवारी २०२४ मध्ये घेतलेल्या जिल्हास्तरीय एसटीएस परीक्षेमध्ये योगिराज विनायक पुराणिक याने गोल्ड मेडल तर यशिका पांडुरंग माडये हिने सिल्व्हर मेडल आणि वेदा अजय नेरूरकर हिने ब्राँझ पदक पटकाविले आहे.  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
You cannot copy content of this page