अणसूर येथे ५५ जणांची आरोग्य तपासणी…

⚡वेंगुर्ला ता.१९-: माधवबाग कुडाळ आणि श्री देव काळोबा प्रासादिक मंडळ अणसूर यांच्या संयुक्त विद्यमाने अणसुर ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा सुमारे ५५ रुग्णांनी लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच सत्यविजय गावडे यांनी विशेष मेहनत घेतली.

  यावेळी मंडळाचे कार्यकर्ते भास्कर गावडे, विजय गावडे, सुनील गावडे, प्रभाकर गावडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. माधव बाग कुडाळ डॉ. अमेय पाटकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी शिबिर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सरपंच सत्यविजय गावडे आणि मंडळाचे कार्यकर्ते यांनी त्यांचे आभार मानले.

फोटोओळी – अणसूर येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच सत्यविजय गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page