⚡कणकवली ता.१९-: मुंबई-गोवा महामार्गावरून चालणाऱ्या कानोजी रुकमाजी गुराम (55 रा. वागदे-सावरवाडी) यांना गोव्याहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत कानोजी हे जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास वागदे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात घडला. गुराम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वारावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुराम हे मुंबई गोवा-महामार्ग ओलांडून बस थांब्याजवळ चालत जात होते. त्यादरम्यान गोव्याकडून कणकवलीच्यादिशेने येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना मागाहून धडक दिली. त्यानंतर दुचाकीस्वाराने धूम ठोकली. अपघातग्रस्त कानोजी यांना ग्रामस्थानी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गुराम यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत तर डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या अपघाताची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात झाली आहे. तपास कणकवली पोलीस करत आहेत.
