Headlines

वेंगुर्ला कॅम्प कॉर्नर नवरात्रौत्सव मंडळातर्फे सार्वजनिक नवरात्रौत्सव

वेंगुर्ला
वेंगुर्ला शहरातील कॅम्प कॉर्नर नवरात्रौत्सव मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक उमेश येरम व उपाध्यक्षपदी रमेश परब यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये
सेक्रेटरीपदी नेलसन मोंतेरो, सहसेक्रेटरीपदी विलास परब, खजिनदारपदी वासुदेव वालावलकर व सहखजिनदारपदी हर्षद वालावलकर यांची निवड करण्यात आली आहे. सदस्यपदी मनीष रेवणकर, संजय बेलवलकर, महेश मेस्त्री, सुशील परब, देविदास वालावलकर, भास्कर म्हस्कर, श्याम वालावलकर, गुणाजी परब, वैभव फटजी, निलेश वराडकर, महेश टेमकर, नारायण फटजी, आनंद शिरोडकर. तसेच सल्लागार पदी ऍड. श्याम गोडकर, डॉ. अनिल वनकुद्रे इत्यादीची निवड करण्यात आली आहे. वेंगुर्ला शहरातील कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. गेली २५ वर्षे हे मंडळ नवरात्र उत्सवाचे आयोजन करीत असून यावर्षीच्या 2026 उत्सवासाठी मंडळाची सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते उमेश येरम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी उमेश येरम तर उपाध्यक्षपदी रमेश परब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. वेंगुर्ला कॅम्प कॉर्नर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे सार्वजनिक नवरात्रौत्सव दि. 12 ते 20 ऑक्टोंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या नवरात्र उत्सवात दि. 12 आँक्टोबर रोजी नवदुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून नवरात्रौत्सव कालावधीत भजन, दांडिया, रेकॉर्ड डान्स, वेशभूषा स्पर्धा, होममिनीस्टर ( खेळपैठणीचा), आर्केस्ट्रा, यासारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी तसेच रसिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page