सावंतवाडी ता.१९-:
डी जी बांदेकर ट्रस्ट संचलित फाउंडेशन कोर्स इन आर्टचे ‘कसब २०२४’ हे वार्षिक कला प्रदर्शन शनिवारी २० व २१ एप्रिल रोजी होत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या या या कलाप्रदर्शनच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव सतीश पाटणकर आणि कला शिक्षक तथा लँडस्केप आर्टिस्ट राजेश आजगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
.या कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जाहिरात व कला क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले काम पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कला रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोविंद बांदेकर आणि सचिव सौ अनुराधा बांदेकर परत यांनी केले आहे.
