Headlines

वेंगुर्ला ठाकरे शिवसेना मार्फत 11 ऑक्टो.पासून सार्वजनिक नवरात्रोत्सव

वेंगुर्ला
वेंगुर्ला
तालुका ठाकरे शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ वेंगुर्ला तालुका शिवसेना कार्यालय, सुंदरभाटले, वेंगुर्ला येथे रविवार दि. ११ ऑक्टोबर ते मंगळवार २० ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.
शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वा. दुर्गामातेचे आगमन,
रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी
सकाळी १० वा.
श्री दुर्गामातेचे पूजन व आरती, दुपारी
२ वा.
महाप्रसाद, सायंकाळी
७ वा. वेंगुर्ला साई मंदिराच्या भक्तांची महाआरती, दांडिया.
सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी
६ वा. भजन, दांडीया,
सायंकाळी ७ वा.
तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा.
रात्रौ ८ वा. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला यांचा दशावतारी नाट्यप्रयोग.
मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी
६ वा.
भजन,
सायंकाळी ७ वा. निमंत्रित दांडिया नृत्य.
बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजी दांडीया
सायंकाळी ७ वा.
निमंत्रीत महिला फुगडी.
गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी
६ वा. भजन, दांडीया,
सायंकाळी
८ वा. श्री. बोर्डेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग यांचा नाट्यप्रयोग.
शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी
सायंकाळी ६ वा. भजन, दांडीया, सायंकाळी ८ वा. तालुकास्तरीय निमंत्रित ग्रुप डान्स.
शनिवार दि.
17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा. भजन दांडिया, रात्री 8 वा. ओमकार कला मंच सावंतवाडी यांचा आर्केस्ट्रा.
रविवार 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वा. भजन, दांडिया, सायंकाळी 7 वा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो (शाहीर पोवाडा). सोमवारी 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वा. भजन, दांडिया , सायंकाळी 7 वा. होम मिनिस्टर. मंगळवार 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा. मांडवी खाडीत विसर्जन संपन्न होणार आहे.या सर्वं कार्यक्रमांस उपस्थित राहून श्री दुर्गा मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन
वेंगुर्ले तालुका शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ नवरात्रोत्सव कमिटी सर्व पदाधिकारी व तालुकाप्रमुख निलेश चमणकर यांनी केले आहे.

फोटो : दुर्गामाता

You cannot copy content of this page