मंत्री दीपक केसरकर यांची टिका:किरण सामंत यांचा शिवसेना मानसन्मान राखणार असल्याचे केले सूतोवाच..
सावंतवाडी ता.१८-: विनायक राऊत दहा वर्ष खासदार होते. उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे होते. परंतु ते साधे राज्यमंत्री सुद्धा होऊ शकले नाहीत. कारण त्यांची काम करण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना गटनेते सारखे पद दिले, असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला.
दरम्यान किरण सामंत ही पदाच्या मागे धावणारी व्यक्ती नाही. ते एक मोठे उद्योजक आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांचे राजकीय करियर उज्वल आहे. त्यांचा योग्य मानसन्मान शिवसेनेत देखील राखला जाईल, असा विश्वास मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
