
आळवाडी येथे घाटपायऱ्यांवर मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण…
⚡बांदा ता.२९-: तेरेखोल नदीत महाकाय मगरिंचे वास्तव्य असून आज आळवाडी येथे घाटपायऱ्यांवर मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. तेरेखोल नदीत हजारोंच्या संख्येने मगरी आहेत. त्यातील काही मगरी या 15 फुटाहुन अधिक लांबीच्या आहेत. आज दुपारी याठिकाणी घाट पायऱ्यांवर महाकाय मगरीचे दर्शन झाले. यामुळे स्थानिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.