अजित पवार यांची अकाली एक्झिटने महाराष्ट्र राष्ट्रवादीचे मोठे नुकसान…

एम. के. गावडे: अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली..

⚡वेंगुर्ला ता.२८-: राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अकाली एक्झिट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. आज महाराष्ट्रवर मोठा आघात झाला असून सिंधुदुर्ग राष्ट्रवादी चा आधार हरपला आहे. त्यांचे अपघाती जाण्याने अतीव दुःख झाले असून त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही, अशी भावुक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव एम. के. गावडे यांनी आज बुधवारी वेंगुर्ला येथे आदरांजली कार्यक्रमात दिली.

यावेळी सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी व कोकणचे मोठे नुकसान झाले असून कोकण कृषी विद्यापीठ कामगार, महिला उद्योग आदी अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावल्याचे नमूद केले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव एम. के. गावडे व राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब व महिला काथ्या औद्योगिक संस्था यांच्यावतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना एम. के. गावडे तसेच प्रज्ञा परब भावुक झाले होते.यावेळी महिला काथ्या संस्थेच्या महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page