मनीष दळवी ; वेंगुर्ला तालुक्यात महायुतीच्या विजयासाठी कामाला लागा..
⚡वेंगुर्ला ता.२८-: माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे हेच आपले आदर्श आहेत. 2005 पासून ना. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचा प्रभाव व उपकार आहेत. खा.नारायण राणे यांच्यापेक्षा कोणतीही पदे मला महत्वाची नाहीत. त्यामुळे राज्याप्रमाणेच जिल्ह्यात महायुतीची सत्ता यावी, वेंगुर्ला तालुक्यातील महायुतीचे 5 ही जिल्हा परिषद सदस्य व 9 ही पंचायत समिती सदस्य निवडून आणणे हेच आपले ध्येय आहे. माझ्या मार्गदर्शक नेत्याची मान, स्वाभिमान सतत उंचावत राहिली पाहिजे, यासाठी आपण सदस्य पदाचे बलिदान देत आहोत. त्यामुळे पुढील आठवड्यात प्रचारावर पूर्ण लक्ष केंद्रित करा.7 फेब्रुवारी ला विजयाचा गुलाल आपल्यालाचा उधळवायचा आहे. त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी अधिकृत भूमिका जाहीर करणार, असे वक्तव्य आज बुधवारी सायंकाळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेतोरे येथे बोलताना व्यक्त केली.
वेंगुर्ला तालुक्यातील बहुचरचित आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष व भाजपचे उमेदवार मनीष प्रकाश दळवी यांनी मंगळवारी अचानक पक्षादेश मानून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे तालुक्यातील भाजपचे, महायुतीचे कार्यकर्ते व सहकारी, हितचिंतक यांची वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालय येथे तातडीची बैठक संपन्न झाली. यावेळी मनीष दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शिवसेना पक्ष निरीक्षक राजेश मोरे, आडेली जि. प. उमेदवार समिधा समीर नाईक, आडेली पं. स. उमेदवार नितीन मांजरेकर, वायंगणी पं. स. उमेदवार शीतल राऊत, माजी जि. प. सदस्य बाबा राऊत, रेडी जि. प. सदस्य उमेदवार प्रितेश राऊळ, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल व प्रशांत प्रभूखानोलकर,नगरसेवक दाजी परब, तुळसचे शंकर घारे, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे,दाभोली उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, भाजपा तालुका चिटणीस कमलेश गावडे, नगरसेवक संदेश निकम, प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, प्रीतम सावंत शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, आडेली सरपंच यशस्वी कोंडसकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, मठ सरपंच रुपाली नाईक, परुळेचे भाजपाचे प्रसाद पाटकर, प्रवीण गडेकर, भाजपा युवा नेते सौरभ नाईक, यतीन आवळेगावकर, वायंगणी माजी उपसरपंच हर्षद साळगावकर, भूषण सारंग, अन्य नगरसेविका आकांक्षा परब, शीतल आंगचेकर, गौरी माईणकर, गौरी मराठे श्री. बोवलेकर, रवि खानोलकर, ज्ञानेश्वर केळजी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मनीष दळवी पुढे बोलताना म्हणाले, आपणास पराभूत करण्यासाठी काही पडद्यामागून अनेक शक्ती कार्यरत असल्याची बाब समोर आल्यावर आपण सदस्य बलिदान देण्याचा निर्णय घेतला. आपण आडेली जिल्हा परिषद मध्येच अडकून राहिलो तर तालुक्यातील उर्वरित जि. प. व पं. स. जाण्याचा धोका होता. त्यामुळे वरिष्टांचा अपमान होऊ नये, यादृष्टीने व महायुतीचा विजय व्हावा, यासाठी आपण आज माजी जि. प. अध्यक्ष असलेल्या समिधा नाईक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व महायुतीच्या पदाधिकारी यांनी पुढील कालावधीत झोकून देऊन काम करावे, तोच आपला विजय ठरेल. यावेळी नगरसेवक संदेश निकम, शंकर घारे, प्रितेश राऊळ, पप्पू परब, नितीन मांजरेकर, कमलेश गावडे, सचिन वालावलकर यांनी मनोगत व्यक्त करताना संपूर्ण महायुती आपल्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे सूचित केले. यावेळी मनीष दळवी यांनी सर्वांचे व्हूण व्यक्त करताना पुढील कालावधीत आपला भाजपा पक्ष वाढला पाहिजे व महायुतीचे 14 ही उमेदवार विजयी होण्यासाठी कार्यरत रहा, असे आवाहन केले.
मनीष दळवी आमदार व्हावेत : संदेश निकम
यावेळी बोलताना नगरसेवक संदेश निकम म्हणाले, माझी आजची ओळख खा. नारायण राणे यांच्यामुळेच आहे. गेली अनेक वर्षे मनीष दळवी सर्वच क्षेत्रात प्रभाविपणे कार्यरत असून मातोश्री कला क्रीडा मंडळासाठी त्यांचे सहकार्य आहे. जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून जनमानसात जी प्रतिमा तयार केली आहे ती आदर्शवत अशीच आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करा.पुढे जाऊन मनीष दळवी यांनी आमदारकीच्या रेसमध्ये यावे. यावेळी शंकर घारे, प्रितेश राऊळ, पप्पू परब, नितीन मांजरेकर, कमलेश गावडे, सचिन वालावलकर, निलेश सामंत, शीतल आंगचेकर, वसंत तांडेल, समिधा नाईक आदीनी मनोगत व्यक्त करताना भाजपा व संपूर्ण महायुती आपल्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे सूचित केले. तसेच मनीष दळवी यांचा उल्लेख उगवता सूर्य, तळपता सूर्य असे करताना ते जनतेच्या मनातील नेते आहेत, असे बोलताना सर्वच भाजपा पदाधिकारी यांनी केले.
यावेळी दिनकर पालव, नितीन चव्हाण, अजित नाईक, यशश्री नाईक, गणेश माईणकर, मितेश परब, सुजाता देसाई, स्वप्नील धुरी, बाळू धुरी, सौरभ परब, सुधीर धुरी, विष्णू कोंडसकर, मंजुषा आरोलकर, बाळकृष्ण येरम, दिपक नाईक, दिपक करंगुटकर, सचिन राऊळ, शेखर कुडाळकर, विजय वालावलकर, संतोष नाईक, प्रकाश करंगुटकर, उत्तम धर्णे, वेदांत नाईक, अनिल गावडे, गुरूदास बागवे, राजबा सावंत,तात्या कोंडसकर आदीसह आडेली, वेतोरे, पालकरवाडी, खानोली, मठ, दाभोली, वजराट पंचक्रोशी व वेंगुर्ला शहरातील महायुतीचे कार्यकर्ते, हितचिंतक, सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्युबाबत श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन रवि खानोलकर व शंकर घारे यांनी आभार मानले.
