मालोंड येथील देवी सती भवानीचा ३१ रोजी जत्रोत्सव…

⚡मालवण ता.२८-:
मालवण तालुक्यातील मालोंड सतीचा मळा येथील श्री देवी सती भवानी आईचा वार्षिक जत्रोत्सव दि. ३१ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. यनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक व अभ्यंग स्नान, सकाळी ८ वा. होम हवन, सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा व महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. हळदीकुंकू, रात्री ८ वा. भजन कार्यक्रम, रात्री ९ वा. पालखी मिरवणूक, रात्री १० वा. दशावतारी नाटक होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभुकूल विस्तार संस्था, समस्त विश्वस्त व मालोंड ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page