सोनुर्ली आणि वेत्ये गावावर उमेदवारी देताना झालेला अन्यायाला जनता उत्तर देणार…

जितेंद्र गावकर:सोनुर्ली श्री.देवी माऊलीला श्रीफळ ठेवून प्रचाराचा केला श्री गणेशा..

⚡सावंतवाडी ता.२९-: माजगाव पंचायत समितीसाठी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जितेंद्र गावकऱ्यांनी झंजावाती प्रचार सुरू केला असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सोनुर्ली श्रीदेवी माऊलीला श्रीफळ ठेवून सोनुर्ली गावात प्रचाराचा श्री गणेशा केला.

सोनुर्ली आणि वेत्ये गावाला उमेदवारी देताना झालेला अन्यायाला उत्तर म्हणून रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि दोन्ही गावांची एकजूट दाखवून द्या असे आवाहन यावेळी उपस्थित मतदारांना त्यांनी केले.
श्री गावकर यांनी भारतीय जनता पार्टीकडे पंचायत समितीची उमेदवारी मागितली होती परंतु ती डावल्याने त्यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे वेत्ये आणि सोनुर्ली या दोन्ही गावासोबतच त्यांना माजगावातूनही प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. ते आपल्या जाहीरनाम्यासह आपली रिक्षा ही निशाणी घरोघरी पोहोचवत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि ग्रामस्थांचा त्यांना पाठिंबा असल्याने आपला विजय हा निश्चित असल्याचा विश्वासही ते बोलून दाखवत आहेत.
आज सोनुर्ली गावातही त्यांनी माऊली चरणी श्रीफळ ठेवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी मोठ्या संख्येने मतदार बांधव उपस्थित होते. उपस्थितांना आवाहन करताना श्री गावकर म्हणाले पक्षाकडे सोनुर्ली आणि वेत्ये या दोन गावामधून उमेदवारी मागितली होती परंतु नेहमीप्रमाणे आमच्यावर यावेळी ही अन्याय करत ती डावलण्यात आली म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उडी घेतली आहे माझा वेत्ये गाव माझ्या पाठीशी ठामपणे उभा असून सोनुर्ली गावानेही झालेला अन्याय सहन न करता माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहवे. दोन्ही गाव सोबत राहील्यास आणि माजगावचे सहकार्य लाभल्यास माझा विजय हा निश्चित आहे. निवडून आल्यास मतदार संघाच्या सर्वांगीन विकासासाठी मी नेहमीच कठिबद्ध राहीन मात्र आज नाही तर परत कधीच नाही त्यामुळे सर्वानी पेठून उठा आणि घरोघरी रिक्षा ही निशाणी पोहचवून मरा विजयी करा.

You cannot copy content of this page