आसोली पंचायत समिती चे बिनविरोध संकेत धुरी यांचा वेंगुर्ला भाजपाच्या वतीने सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातुन पं.स. निवडणुकीत भाजपाचे ( महायुती) बिनविरोध विजयी खाते खोलणारे आसोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संकेत संदीप धुरी यांचा वेंगुर्ला भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.प यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, उभादांडा जि.प.मतदार संघाचे उमेदवार मनवेल फर्नांडिस , नगरसेविका गौरी मराठे, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, बुथप्रमुख नामदेव सरमळकर, संजय मळगावकर, आनंद मेस्त्री, शैलेश नार्वेकर, सिताराम साळगावकर, ग्रा.पं.सदस्य राकेश धुरी, संतोष सावंत , मारुती दोडशानट्टी, अर्जुन तांडेल, प्रितम सावंत, संदेश धुरी, सिरिल आल्मेडा , अरॉन फर्नांडिस, इनासिन फर्नांडिस, देवेंद्र डिचोलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page