मी तुमचा हक्काचा माणूस; पुन्हा आशीर्वाद द्या…

दिनेश सावंत: माजगाव जि.प. मतदारसंघातील ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा केला शुभारंभ..

⚡सावंतवाडी, ता.२९-: “मी तुमचा हक्काचा माणूस असून सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे मला पुन्हा एकदा आशीर्वाद द्या,” अशी भावनिक हाक ठाकरे शिवसेनेचे माजगाव जिल्हा परिषद उमेदवार दिनेश सावंत यांनी दिली. माजगाव व सोनुर्ली येथील ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन त्यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.


यावेळी बोलताना सावंत म्हणाले, “ज्या विश्वासाने ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत जनतेने मला निवडून दिले, त्याच विश्वासाने या निवडणुकीतही मला साथ द्यावी. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तुमची साथ मला हवी आहे. तुमचे प्रश्न, अडचणी निवडणूक झाल्यानंतर निश्चितपणे मार्गी लावण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील,” असा विश्वास त्यांनी उपस्थित मतदारांना दिला.
यानंतर त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दर्शविला. “मी तुमचाच हक्काचा माणूस आहे, त्यामुळे मताच्या रूपाने पुन्हा एकदा आशीर्वाद द्या,” असे आवाहनही त्यांनी मतदारसंघातील जनतेला केले.
याप्रसंगी चंद्रकांत कासार, मंगेश राठवड, अशोक धुरी, रमेश गावकर, सुनील गावडे, विश्राम कांबळी, ठाकूर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page