बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम उद्या होणार संपन्न…

⚡बांदा ता.२१-: जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेचा सन २०२३-२४या शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनपर कलाविष्कार हा कार्यक्रम शुक्रवार दि.२२ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार असून यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ज्ञानकुंज या हस्तलिखिताचे प्रकाशन तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे व मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी कळविले आहे.

Read More

दोडामार्ग-बांदा मार्गावर अवैध खैरवाहतुक करताना तिघांना घेतले ताब्यात…

फिरतेपथक सावंतवाडी टीमची कारवाई:कोर्टाने सुनावली दोन दिवसांची वनकोठडी.. ⚡सावंतवाडी ता.२१-: आज पहाटे दोडामार्ग-बांदा मार्गाने खैराची तोड करून अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना त्याच्या चारचाकी वाहनसह सावंतवाडी वन विभागाच्या फिरतेपथक टीमने ताब्यात घेतले. सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता मा. सावंतवाडी न्यायालयाने तीन आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली.

Read More

नवनियुक्त सहाय्यक मत्स्य आयुक्तांचे मच्छिमार सोसायटी प्रतिनिधीनी केले स्वागत…

⚡मालवण ता.२१-: मालवण येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात सहायक मत्स्य आयुक्त पदी सागर विजय कुसवेकर यांची नियुक्ती झाली असून मालवण तालुक्यातील मच्छिमार सोसायटीच्या प्रतिनिधीनी कुसवेकर यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मच्छिमारांच्या विविध समस्या व प्रश्नांबाबत कुसवेकर यांचे लक्ष वेधले. एमपीएससी परीक्षे मधून सागर कुसवेकर यांची पहिलीच नियुक्ती मालवण येथे सहाय्यक मत्स्य…

Read More

ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश…

⚡कणकवली ता.२१-: ठाकरे शिवसेना गटाला कणकवली शहरात मोठा धक्का बसला असून कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी तडकाफडकी ठाकरे सेनेला सोडचिट्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कणकवली शहरप्रमुख मसुरकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणूकीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मागील 3 महिने आपल्याशी संपर्कच…

Read More

मालवण नगरपालिका प्रशासनाचे स्वच्छतेबाबत नियोजन शून्य…

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरात नगरपालिका प्रशासनाचे स्वच्छतेबाबत नियोजन नाही, बायो टॉयलेट गाड्या वापराविना, सक्शन गाडीचे अयोग्य नियोजन, डास फवारणी बंद, पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, फोवकांडा पिंपळ येथील बंद फाउंटन, भाजी मार्केट तसेच मल्टीपर्पज हॉल काम बंद, मासे मार्केटवरील गाळे लिलाव नाही, अशा शहरातील विविध समस्या…

Read More

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…

⚡मालवण ता.२१-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यायाचा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. जिमखाना विभागामार्फत आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा, परीक्षा व कला क्रीडा स्पर्धामध्ये यश मिळविलेल्या ४०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मालवण पोलीस स्थानकाचे पीएसआय श्री. आनंद पांडुरंग…

Read More

शेवटच्या ४८ तासांत उमेदवारी जाहीर झाली तरी महायुतीचा विजय…

आ नितेश राणे:खा राऊत यांची रिटर्न तिकीट काढून ठेवलेली आहे.. कणकवली-:रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढविण्या बाबत चर्चा होत आहे. महायुतीचे नेते त्यावर निर्णय घेत आहेत. उशीर होत असला तरी शेवटच्या ४८ तासात उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ असताना जरी उमेदवार जाहीर झाला. तरी महायुतीचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला. विनायक राऊत…

Read More

सामाजिक वनीकरणच्या वृक्ष लागवडीची चौकशी करा…

मनसेच्या सचिन तावडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ओरोस ता २१शासनाची ३३ कोटी वृक्ष लागवड तसेच अन्य वृक्ष लागवड उपक्रम अंतर्गत जिल्ह्यात खोट्या नोंदी दाखवून शासनाचे लाखो रुपये सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लुटले आहेत. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन…

Read More

विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या परजिल्ह्यातील वाहनांना रोखा…

मनसेच्या सचिन तावडे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी.. सिंधुदुर्गनगरी ता २१सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातील अवजड वाहने विनापरवाना विविध व्यवसाय करीत आहेत .तरी जिल्ह्यात बेकायदेशीरपणे फिरत असलेल्या वाहनांवर कारवाई करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हा…

Read More

गेली दहा वर्षे खासदारकीचा वापर जनकल्याणासाठी केला…

खा विनायक राऊत:सिंधुदुर्गनगरी येथे प्रचार कार्यालयाचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी ता २१-:खासदारकीचा मिजास मिरविण्यापेक्षा खासदारकीचा वापर आपण गेली १० वर्षे जनकल्याणसाठी केला याचे आपल्याला समाधान आहे. २०१४, २०१९ नंतर आता २०२४ मध्येही आपला विजय निश्चित असून विरोधकांनाही ते माहीत आहे. त्यामुळे आपल्या विरोधात कमीत कमी मताने कोणता उमेदवार पडेल, याची चाचपणी विरोधक करत असल्याचा टोला खा विनायक…

Read More
You cannot copy content of this page