एकपात्री अभिनय स्पर्धेत सीमा मराठे अंतिम फेरीत…
⚡वेंगुर्ला ता.२२-: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमार्फत बोरिवली येथे घेण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या एकपात्री अभिनय स्पर्धेमधून वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा शशांक मराठे यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. फोटो – सीमा मराठे
