कणकवलीत वृक्ष बँकेतर्फे रोपांचे वाटप…

⚡कणकवली ता.०८-: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या या संस्थांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृक्ष बँकेची स्थापना करण्यात आली आहे. या वृक्ष बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकाणी मोफत वृक्षांच्या रोपांचे वाटप केले जाणार आहे.


जिल्ह्यात बापू परब आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या मार्गदर्शनातून कणकवली तालुक्यातही वृक्ष बँक स्थापन करण्यात आली आहे. या बँकेच्या माध्यमातून तालुक्यात ठिकठिकाणी नारळ, सुपारी झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक पंढरी जाधव, तालुकाध्यक्ष अतुल दळवी, मयूर ठाकूर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page