Headlines

राजधानी एक्स्प्रेसचा सावंतवाडीत पहिला थांबा…

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून उत्स्फूर्त स्वागत..

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी रेल्वे स्थानकास राजधानी एक्स्प्रेसचा थांबा मिळाल्यानंतर आज प्रथमच ही रेल्वे स्थानकात आली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून राजधानी एक्स्प्रेसच जल्लोषी स्वागत करण्यात आले. ६ वर्षांनी काढून घेतलेला थांबा पुन्हा मिळाल्याने संघटनेने आनंदोत्सव साजरा केला आहे.

सकाळी ९.३० वा. राजधानी एक्स्प्रेस सावंतवाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून रेल्वेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. तसेच रेल्वेच्या दोन्ही चालकांचा सत्कार करण्यात आला. पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाकाळात गरीबरथ आणि राजधानी एक्स्प्रेस बंद झाल्या होत्या. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे गरीबरथ, राजधानी एक्स्प्रेस आणि मंगळूरू एक्स्प्रेस प्राप्त झाल्यात. मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळालं असून लोकनेते मधू दंडवते टर्मिनस यांचं नाव या स्थानकाला दिलं आहे. भविष्यात त्यांचा नावाला शोभेल असं कार्य इथे व्हाव अशी इच्छा संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी उपाध्यक्ष सागर तळवडेकर, ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजिनदार भूषण बांदिवडेकर, सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोकळे, निधी धुरी, करण धुरी, श्री.तानावडे, रिक्षा संघटना मळगावचे पदाधिकारी, तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page