राजन तेली; लोकसभा निवडणुकीत मॅन ऑफ द मॅच कार्यकर्तेच, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे देखील मानले आभार
सावंतवाडी ता.०८-: नोव्हेंबर मध्ये घेण्यात आलेल्या डीपीडीसी बैठकीमध्ये अनेक विकासकामांना पालकमंत्र्यांनी मंजूर दिली. परंतु काही अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर काढल्या नाहीत.त्यामुळे अनेक काम रखडली त्याचा परिणाम देखील या निवडणुकीत काही मतांना बसला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेऊन कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केला. दरम्यान आडाळी एमआयडीसी मंजूर करण्यात आलेला अत्तर प्रकल्प हा लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी देखील आपण नारायण राणे यांच्याकडे करणार असल्याचे देखील यांनी श्री.तेली यांनी यावेळी सांगितलं.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी तेली पुढे म्हणाले की सावंतवाडी तालुक्यात जिओ व बीएसएनएल नेटवर्कचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने अनेक लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या संदर्भात देखील आपण राणेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधणार आहे असेही श्री तेली यांनी यावेळी सांगितले. दरम्यान
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान मंदिरांचा जसा विकास झाला तशा स्वरूपाचा विकास कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावातील देवस्थान मंदिरांचा व्हायला हवा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि या पर्यटन जिल्ह्यात अध्यात्मिक विकास होणे आवश्यक आहे पश्चिम महाराष्ट्र अध्यात्मिक पर्यटन विकास पॅटर्न या भागात राबवा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आदींची भेट घेऊन करणार आहे. असे ही श्री तेली यांनी यावेळी सांगितले. दरम्यान नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक असून त्यामुळे राणेंच्या विजयात माझं मॅन ऑफ द मॅच हे माझ्या कार्यकर्त्यांना आहे,तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी राणेंना या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार दिली त्याबद्दल देखील त्यांनी विशेष आभार मानले. तसेच महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतलेले विशेष मेहनतीचे देखील त्यांनी मनापासून आभार मानले.
