⚡सावंतवाडी ता.०७-: महावितरणचा अजब कारभार सुरू आहे. काल बांद्यात व आज सावंतवाडीत पोलवरून शॉक लागून पडल्याने कर्मचारी गंभीर झाले आहेत. जिल्हा नियोजन सदस्य तथा कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. आजवर ९ मुलं मयत पावलीत. अनेक जण अपघात होऊन घरी बसलेत. त्यामुळे उगाच अती करू नका, उद्रेक होईल असा इशारा त्यांनी महावितरणला दिला. हा विषय सोडणार नाही. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमोर जिल्हा नियोजन बैठकीत मांडणार अस ते म्हणाले. कंत्राटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी ना महावितरण ना कंत्राटदार घेत नाहीत. त्यामुळे तुमची जबाबदारी सांगा, याबाबत निर्णय घ्या. अन्यथा सोडणार नाही असा इशारा श्री. सावंत यांनी दिला. उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांना त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
पोलवरून शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची अशोक सावंत यांनी भेट घेतली विचारपूस…
