मालवणात शिवचरित्रावर आधारित पुस्तकांच्या प्रदर्शनास प्रतिसाद…

⚡मालवण ता.०६-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने मालवण येथील नगर वाचन मंदिराच्या वाचन कक्षामध्ये शिवरायांच्या चरित्रावर आधारित विविध लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनास शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे नियमित वाचक यशराज मोरे व मयुरेश सारंग यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून आणि शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. या प्रदर्शनात रणजीत देसाई यांचे ‘श्रीमानयोगी’, गुरूनाथ नाईक यांचे ‘छत्रपती’, राजा लिमये यांचे ‘रणराज शिवाजी’, बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’, विश्वास पाटील यांचे ‘महासम्राट’, बा. सी. बेंद्रे यांचे ‘शिवराज्याभिषेक प्रयोग’, नाथमाधव यांचे ‘स्वराज्यावरील संकट’, प्रकाश यादवाडकर यांचे ‘मंत्रयुध्द’, नयनतारा यांचे ‘कथा शिवरायांच्या’, अनिल माधव दवे यांचे ‘छत्रपती शिवाजी आणि सुराज्य’ यासारखी पुस्तके मांडण्यात आली होती.

You cannot copy content of this page