Headlines

एसटी बस व आयशर टेम्पोत समोरासमोर धडक…

वैभववाडी भुईबावडा येथील घटना:एस टी बसमधील २० प्रवाशांना किरकोळ दुखापत.. ⚡वैभववाडी ता.१२-: भुईबावडा रिंगेवाडी दरम्यान फार्म हाऊस नजिक एका तीव्र वळणावर एसटी बस आणि आयशर टेम्पोत समोरासमोर धडक झाली. ही घटना बुधवारी सकाळी ९. वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एस टी बसमधील सुमारे २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे….

Read More

सावंतवाडी शहरात अज्ञात चोरट्याने चार फ्लॅट व रो हाऊस फोडल्याने खळबळ…

▪️घटनास्थळी पोलिसांची धाव; अधिक तपास सुरू.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा मध्ये अज्ञात चोरट्याने चार फ्लॅट व एक रो हाऊस फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत सदर ठिकाणाची पाहणी केली.दरम्यान एका प्लेट मधून दहा हजार ची रोकड लंपास केली असून संबंधित फ्लॅट धारकांनी धाव घेतली आहे.

Read More

सावंतवाडीत तंत्रशिक्षण विभागाचे समुपदेशन केंद्र सुरु…

⚡सावंतवाडी ता.१२-: राज्यात अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असून राज्य तंत्रशिक्षण विभागातर्फे येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे._राज्य शासनाचे अधिकृत प्रवेश केंद्र क्र.३४७० येथे सुरु असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष प्रवेश याठिकाणी सुरु आहे.चालू शैक्षणिक वर्षी थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेत…

Read More

पोलीस भरतीची मैदानी परीक्षा १९ जून पासून…

सौरभ कुमार अग्रवाल:१४२ जागांसाठी आले आहेत ८०४२ अर्ज.. ओरोस ता.१२-: जिल्ह्याच्या पोलीस दलात रिक्त असलेल्या १४२ जागांसाठी ८०४२ अर्ज दाखल झाले आहेत. या भरती प्रक्रियेतील मैदानी परीक्षा १९ जून पासून पोलीस दलाच्या सिंधुदुर्गनगरी येथील परेड मैदानावर होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. डिसेंबर २०२३ अखेर रिक्त असलेल्या पोलीस जागांसाठी…

Read More

जिल्ह्यातील सात अधिकारी झाले पोलीस निरीक्षक…

सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून शासनाने दिली पदोन्नती.. ओरोस ता.१२-: राज्य शासनाने आज पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४४७ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. राज्य शासनाने पदोन्नतीने पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बांदा येथे कार्यरत असलेले विकास बडवे…

Read More

‘ड्रोन’च्या मदतीने बेपत्ता मच्छिमाराचा पोलीस प्रशासनाकडून शोध…

⚡मालवण ता.११-:तळाशील खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय 55) या मच्छिमारांचा तीन दिवस उलटले तरी शोध लागला नाही. दरम्यान, मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रोनच्या मदतीने परिसरात शोध मोहिम घेतली. मात्र बेपत्ता मच्छिमाराचा शोध लागला नाही. दरम्यान, तीन दिवसांपासून स्थानिक ग्रामस्थ, शोध पथक, पोलीस तसेच प्रशासन यंत्रणा, कोस्ट गार्ड…

Read More

तरुण पिढीला सुसंस्कारीत बनवूया…

गोपुरी आश्रमातील परिसंवाद कार्यक्रमात मान्यवरांचा सूर.. ⚡कणकवली ता.११-: आधुनिक युगात तरुण पिढी सुशिक्षित होत आहे. मात्र, सुसंस्कारीत होताना दिसत नाही. या पिढीला सुसंस्कारीत करणे ही समाजाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात शाळांमधील साने गुरुजीच्या कथामालेला ब्रेक लागला आहे. कथामाला पुन्हा सुरु होण्यासाठी शिक्षकांसह सामाजिक चळवळीत…

Read More

मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री यांना पितृशोक…

⚡कणकवली ता.११-: कलमठ-सुतारवाडी येथील रहिवाशी तथा जिल्हा बँकेचे कर्मचारी चंद्रकांत उर्फ कांता बाळकृष्ण मेस्त्री (65) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. चंद्रकांत यांना मंगळवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. मेस्त्री यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच आमदार नीेतेश राणे यांनी आपला दौरा अधर्वट…

Read More

प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या 12 विक्रेत्यांवर न. पं. दंडात्मक कारवाई…

⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरात प्लास्टिक बंदी असतानाही काही विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. मंगळवारच्या आठवड्या बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या 12 विकेत्यांवर नगरपंचायत प्रशासानाने कारवाई करत प्लास्टिक पिशव्या जप्त करत 26,000 रुपयांचे दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल अघम, विनोद सावंत, सतीश कांबळे ध्वजा उचले व…

Read More

लोकसभेच्या एका पराजयाने शिवसैनिक खचलेला नाही…

बाबी जोगी: वैभव नाईकांची मतदारसंघात जायंट किलर म्हणूनच ओळख… ⚡मालवण ता.११-: लोकसभेतील एका पराजयाने शिवसैनिक खचलले नाहीत तर नव्या उमेदीने येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. जायंट किलर म्हणून ओळख असलेल्या आमदार वैभव नाईक यांची ही ओळख शिवसैनिक, मतदार जनता निश्चितच ठेवेल आणि त्यांना मंत्रीही बनवतील. त्यामुळे टीकाकारांनी आमदारांची काळजी करू नये अशी टीका उबाठा…

Read More
You cannot copy content of this page