Headlines

हळवलमधील कॉजवेचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद…

⚡कणकवली ता.१२-: हळवल गावातील शिवराई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॉजवेचे काम सुरु आहे. मात्र, सदर काम नित्कृष्ट दर्जाचे आल्याचा ठपका ठेवत ग्रामस्थानी काम बंद पाडले. जिल्हा परिषदच्या जिल्हा वार्षिक निधीतून तब्बल ४३ लाखांचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला होता. या कॉजवेच्या कामाची ऑर्डर आचार संहितेपूर्वी काढण्यात आली होती. मात्र, सदर ठेकेदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कामाला…

Read More

घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 23 रोजी गुणगौरव सोहळा…

⚡कणकवली ता.१२-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई , सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने रविवार २३ जून रोजी सकाळी 10 वाजता कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५% पेक्षा अधिक आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक गुण मिळाले असतील. ५ वी व…

Read More

आनंदीबाई रावराणे विद्यालयात व्यावसायिक फूड व्हॅनचे उद्घाटन…

वैभववाडी प्रतिनिधी-:आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे विद्यार्थिनींना व्यवसायामध्ये सक्षम बनवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज दिनांक 12 जून 2024 रोजी व्यावसायिक फूड व्हॅनचे उद्घाटन संपन्न झाले. महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकण कन्या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना व्यावसायिक…

Read More

विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते कौशल्य व तंत्रशिक्षण…

मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांची माहिती ः निकालाची परंपराही उज्ज्वल.. कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर प्रशालेत शिक्षणाव्यतिरिक्त कौशल्य व तंत्रशिक्षण दिले जात आहे. विद्यामंदिर प्रशालेत मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमांचे विभाग आहेत. या विभागांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. विद्यामंदिर प्रशाला ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व सर्जनशीलता जोपासणारी शाळा आहे, असे मुख्याध्यापक पी….

Read More

पर्यटन स्वागत केंद्राच्या नूतनीकरणासाठी निधी द्या…

बबन साळगावकर ; महाराष्ट्र शासनाकडे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी नगरपरिषद आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या टुरिस्ट रिसेप्शन सेंटर संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी तीन कोटी 50 लाख रुपये महाराष्ट्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली. दरम्यान सावंतवाडी टुरिस्ट रिसेप्शन सेंटर ची मुदत संपली…

Read More

शहरातून नारायण राणेंना एेतिहासिक लीड…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती ः शहरातील मतदारांचे नलावडेंनी मानले आभार.. ⚡कणकवली ता.१२-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही उमेदवाराला शहरातून फारसे लीड मिळाले नव्हते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार तथा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना 1717 एवढे एेतिहासिक लीड मिळाले. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे यांच्या…

Read More

मनीष देसाई मृत्यूस जबाबदार ठरलेल्या दोषींना तात्काळ अटक करा…

राजकीय पुढार्‍यांसह नातेवाईक व मित्र परिवाराकडून मागणी:संध्याकाळपर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचं पोलीस उप विभाग अधिकाऱ्यांच आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.१२-: जेसीबीच्या धडकेत गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत झालेल्या सावंतवाडी शहरातील मनीष महादेव देसाई या एकोणीस वर्षाच्या युवकाच्या मृत्यूस बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदार जेसीबी मालक तसेच अन्य दोषींना जबाबदार पकडून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक…

Read More

भूमिगत विजवाहिन्या कार्यान्वित कराव्यात…

वेंगुर्ला नगरपरिषदेकडून विज कंपनीला पत्र.. ⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला शहरातील काही भागांमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत जमिनीखालून विज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या भूमिगत विजवाहिन्या कार्यान्वित कराव्यात. जेणेकरून झाडाच्या फांद्या किवा झाड पडून विद्युत पुरवठा खंडित होणार नाही अशा आशयाचे पत्र वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वेंगुर्ला उपअभियंतांना दिले आहे.

Read More

एसटी बस व आयशर टेम्पोत समोरासमोर धडक…

वैभववाडी भुईबावडा येथील घटना:एस टी बसमधील २० प्रवाशांना किरकोळ दुखापत.. ⚡वैभववाडी ता.१२-: भुईबावडा रिंगेवाडी दरम्यान फार्म हाऊस नजिक एका तीव्र वळणावर एसटी बस आणि आयशर टेम्पोत समोरासमोर धडक झाली. ही घटना बुधवारी सकाळी ९. वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एस टी बसमधील सुमारे २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे….

Read More

सावंतवाडी शहरात अज्ञात चोरट्याने चार फ्लॅट व रो हाऊस फोडल्याने खळबळ…

▪️घटनास्थळी पोलिसांची धाव; अधिक तपास सुरू.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा मध्ये अज्ञात चोरट्याने चार फ्लॅट व एक रो हाऊस फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत सदर ठिकाणाची पाहणी केली.दरम्यान एका प्लेट मधून दहा हजार ची रोकड लंपास केली असून संबंधित फ्लॅट धारकांनी धाव घेतली आहे.

Read More
You cannot copy content of this page