राजकीय पुढार्यांसह नातेवाईक व मित्र परिवाराकडून मागणी:संध्याकाळपर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचं पोलीस उप विभाग अधिकाऱ्यांच आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.१२-: जेसीबीच्या धडकेत गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत झालेल्या सावंतवाडी शहरातील मनीष महादेव देसाई या एकोणीस वर्षाच्या युवकाच्या मृत्यूस बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदार जेसीबी मालक तसेच अन्य दोषींना जबाबदार पकडून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी आज शहरातील राजकीय पुढार्यांसह नातेवाईक व मित्र परिवाराकडून पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांच्याकडे करण्यात आली.
जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका सर्वानी घेताच संध्याकाळपर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस उपविभागीय अधिकारी श्री कांबळे यांनी दिले.
शब्बीर मणियार सुधीर आडीवरेकर सुरेश भोगटे,उमाकांत वारंग,बबन साळगावकर, तानाजी वाडकर,सिताराम गावडे,महेश सारंग, एकनाथ नाडकर्णी, वाडकर,राजू धारपवार, गणेश कदम आदी यावेळी उपस्थित होते.
