⚡कणकवली ता.१२-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई , सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने रविवार २३ जून रोजी सकाळी 10 वाजता कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५% पेक्षा अधिक आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक गुण मिळाले असतील. ५ वी व ८ वी स्कॉलरशिप प्राप्त यादीतील विद्यार्थी, नवोदय निवड यादीतील विद्यार्थी, इंजिनिअरिंग, मेडिकल, बी. फार्मसी पास विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला येताना मार्लिस्टची झेरॉक्स कॉपी घेऊन येणे. या सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी सूर्यकांत घाडी (9422967374), प्रदीप घाडी, बुधाजी घाडीगांवकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख विजय गांवकर यांनी केले आहे.
घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 23 रोजी गुणगौरव सोहळा…
