⚡कणकवली ता.११-: कलमठ-सुतारवाडी येथील रहिवाशी तथा जिल्हा बँकेचे कर्मचारी चंद्रकांत उर्फ कांता बाळकृष्ण मेस्त्री (65) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. चंद्रकांत यांना मंगळवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. मेस्त्री यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच आमदार नीेतेश राणे यांनी आपला दौरा अधर्वट सोडून रुग्णालयात धाव घेतली. धार्मिक वृत्तीचे असलेले चंद्रकांत मेस्त्री हे सर्वांशी सलोख्याचे संबंध राखून होते. ते अष्टपैलू क्रिकेटपटूही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ, भावजया असा मोठा परिवार आहे. भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष तथा माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री तर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचे ते वडील होत.
मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री यांना पितृशोक…
