प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या 12 विक्रेत्यांवर न. पं. दंडात्मक कारवाई…

⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरात प्लास्टिक बंदी असतानाही काही विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. मंगळवारच्या आठवड्या बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या 12 विकेत्यांवर नगरपंचायत प्रशासानाने कारवाई करत प्लास्टिक पिशव्या जप्त करत 26,000 रुपयांचे दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल अघम, विनोद सावंत, सतीश कांबळे ध्वजा उचले व अन्य कर्मचाऱ्यांनी केली.

You cannot copy content of this page