Headlines

संतोष राणे यांची कोकण विभागा गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य पदी नियुक्त…

⚡सावंतवाडी ता.१८-: युनियन बँक आॅफ इंडियाचे माजी शाखा व्यवस्थापक, कुडाळ एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे कायम निमंत्रित कार्यकारिणी सदस्य व प्रतिथयश नव उद्योजक संतोष राणे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या कोकण विभागातून गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. ही निवड चेंबरच्या वतीने चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी…

Read More

ज्येष्ठ नागरिक नाऊ बोडेकर यांचे वृद्धापकाळाने राहात्या घरी निधन…

⚡वैभववाडी ता.१८-: खाबाळे दारयेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक नाऊ धाकलू बोडेकर वय 81 यांचे वृद्धापकाळाने राहात्या घरी निधन झाले.त्यांच्यावर खांबाळे येथील मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित तीन मुली दोन मुलगे सुना नातवंडे जावई. असा मोठा परिवार आहे.

Read More

महाळुंगे येथे चक्रीवादळामुळे घराचे छप्पर उडून 23 हजार सहाशेचे नुकसान…

देवगड(प्रतिनिधी)१८ जुलै २०२४ 90 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून शासनाने अजूनही अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे.

Read More

इळये वरंडवाडी येथील बेपत्ता २८ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला…

⚡देवगड ता.१८-: इळये वरंडवाडी येथील बेपत्ता किरण मंगेश सावंत (२८) या युवकाचा मृतदेह तेथील प्राथमिक शाळेच्या ओहोळात बुधवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास आढळून आला. किरण या १४ जुलैपासून बेपत्ता होता. चार दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण सावंत हा १४…

Read More

तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ११ रोजी गुणगौरव…

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ, शाखा-वेंगुर्ला तर्फे समाजातील दहावी, बारावी, पदविका, शिष्यवृत्ती तसेच विशेष परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी मठ येथील संतोष नांदोसकर यांच्या निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Read More

मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुणाजी गावडेंकडून शाळेतील मुलांना खाऊ वाटप…

⚡सावंतवाडी ता.१८-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत सर्व मुलांना सरपंच गुणाजी गावडे यांनी खाऊ वाटप करून मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी गुरुदास गावकर शरद जाधव संतोष गावडे महेश गावडे शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.

Read More

रस्त्याचा अंदाज न आल्याने आयशर टेम्पो गटारात कलंडून अपघातग्रस्त…

⚡बांदा ता.१९-: गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो रस्त्याचा अंदाज न आल्याने बांदा निमजगा येथे गटारात कलंडून अपघातग्रस्त झाला. हा अपघात आज दुपारी झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी जाणारे पर्यटक हे बांदा दाणोली मार्गाचा वापर करत असल्याने या मार्गावार वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना…

Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त रविवारी प. पूज्य श्री संत सदगुरु आनंदी गुरुजी यांचा दर्शन सोहळा…

कुडाळ : रविवार, २१ जुलै रोजी परम पूज्य श्री संत सदगुरु आनंदी गुरुजी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन सोहळा आयोजित केला आहे. गुरुशिष्याचे नाते दृढ करणारा उत्सव आषाढ शुक्ल पौर्णिमा या दिवशी सकाळी ठीक १०.३० वाजता ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ती संस्थेच्या बावळाट फौजदार वाडी (ता : सावंवाडी) या मठामध्ये आयोजित केला आहे. तरी सर्व सद्भक्तांनी भाविकांनी…

Read More

आधारकार्ड केंद्रावरील अडचणी दूर करा…

मनसेची मागणी:जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्रांवर नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले. सुरुवातीला काही वर्षांपूर्वी जेव्हा आधारकार्ड मुख्य पुरावा म्हणून सक्तीचा करण्यात आला त्यावेळी जिल्ह्यातील काहीच मुख्य ठिकाणी आधार कार्ड केंद्रे असल्याने आधार कार्ड केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. अशावेळी…

Read More

तहसीलदार कार्यालयातूननागरिकांना सुविधा व दाखले तात्काळ मिळण्यासाठी कार्यवाही करावी…

अरविंद मोंडकर:अन्यथा भर पावसात कार्यालयासमोर आंदोलन करणार.. ⚡मालवण ता.१८-:मालवण तहसीलदार कार्यलयात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा व दाखल्यांबाबत दिरंगाई होत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. मालवणच्या तहसीलदारांमध्ये कामाची तत्परता व कार्यालयीन पकड दिसून येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून नागरिकांना सुविधा व…

Read More
You cannot copy content of this page