⚡बांदा ता.१९-: गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो रस्त्याचा अंदाज न आल्याने बांदा निमजगा येथे गटारात कलंडून अपघातग्रस्त झाला. हा अपघात आज दुपारी झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी जाणारे पर्यटक हे बांदा दाणोली मार्गाचा वापर करत असल्याने या मार्गावार वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाला. या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. सायंकाळी उशिरा टेम्पो बाहेर काढण्यात आला. अपघाताची बांदा पोलिसात नोंद करण्यात आली नाही.
