इळये वरंडवाडी येथील बेपत्ता २८ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला…

⚡देवगड ता.१८-: इळये वरंडवाडी येथील बेपत्ता किरण मंगेश सावंत (२८) या युवकाचा मृतदेह तेथील प्राथमिक शाळेच्या ओहोळात बुधवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास आढळून आला. किरण या १४ जुलैपासून बेपत्ता होता. चार दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण सावंत हा १४ जुलै रोजी सकाळी ८ वा. च्या सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार तिची आई मनिषा सावंत यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली होती. मात्र, किरण याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास तेथील प्राथमिक शाळेनजीकच्या ओहोळात आढळून आला. ओहोळातील पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचा तपास हवालदार राजन जाधव करीत आहेत. किरण हा अविवाहित होता. मोलमजुरी करून तो उदयनिर्वाह करीत होता.

You cannot copy content of this page