तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ११ रोजी गुणगौरव…

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ, शाखा-वेंगुर्ला तर्फे समाजातील दहावी, बारावी, पदविका, शिष्यवृत्ती तसेच विशेष परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी मठ येथील संतोष नांदोसकर यांच्या निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

  तेली समाजातील ज्या विद्यार्थ्यांना दहावीत ७५ टक्के व बारावीत ७० टक्के पेक्षा जास्त गुण आहेत अशांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत ६ ऑगस्टपर्यंत क्वॉलिटी कोल्ड्रिक्स, दाभोली नाका, वेंगुर्ला येथे किवा नम्रता वरसकर, भटवाडी-वेंगुर्ला येथे आणून द्यावीत. या कार्यक्रमाला तेली समाजातील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी तसेच समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष सुनिल नांदोसकर व सचिव विद्याधर वरसकर यांनी केले आहे.
You cannot copy content of this page