श्यामसुंदर घाडी यांचे निधन…

⚡कणकवली ता.१२-: देवगड तालुक्यातील किंजवडे वरचीघाडीवाडी रहिवासी व आंबा बागायतदार श्यामसुंदर सोमाशेठ घाडी (59 ) यांचे निधन झाले. ते मनमिळाऊ होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, मुलगा, मुलगी , पत्नी, भाऊ, भावजय, चुलते, बहिणी असा परिवार आहे. आंबा बागायतदार भाई घाडी यांचे ते वडील होत.

Read More

श्री देवी सातेरी मंदिर मातोंड येथे १४ व १५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा…

⚡वेंगुर्ला ता.१२-: मातोंड – पेंडूर गावची ग्रामदैवत श्री देवी सातेरी परिवार देवतांचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १४ व १५ मे रोजी श्रीदेवी सातेरी मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहे.मंगळवार १४ मे रोजी सकाळी ९ वाजता श्री देवी कवच आवृत्ती,सकाळी १० ते १ वाजेपर्यत महिलांसाठी कुंकूमार्चन,रात्री ८ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत ट्रिकसिनयुक्त ‘ काली कंकाली ‘ नाट्यप्रयोग बुधवार…

Read More

हळवल फाटा येथे स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी…

⚡कणकवली ता.१२-: मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा स्ट्रीट लाईट बसविण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. हळवल फाटा येथील वळण अपघात प्रवण क्षेत्र आहे. फाट्यालगत असलेले वळण वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक आहे. रात्रीच्यावेळी याठिकाणी लाईट नसल्यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात झाले आहेत. त्यातच रात्रीच्यावेळी याठिकाणी सरपटणारे प्राणी व मोकाट जनावरांचा वावर असतो. त्यामुळे याठिकाणी स्ट्रीट लाईट बसविणे नितांत गरजेचे…

Read More

सिंपन प्रतिष्ठानचा उद्या पुरस्कार प्रदान सोहळा…

बाळकृष्ण जाधव यांची माहिती : आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती.. कणकवली : सिंपन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्यावतीने मंगळवार 14 मे रोजी सकाळी 10.30 वा. मराठा मंडळ नाट्यगृहात परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला. या सोहळा सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लीकन सेनेचे सरसेनानी आनंदराज…

Read More

वाघेरी ग्रामविकास मंडळातर्फे अक्षता कांबळी यांचा सन्मान…

⚡कणकवली ता.१२-: कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेत्री अक्षता कांबळी वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईतर्फे सन्मानित केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक राणे, खजिनदार सूर्यकांत गुरव, सुधाकर राणे, माजी सरपंच संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळातर्फे कांबळी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी अशोक राणे, सूर्यकांत गुरव, सुधाकर राणे, अक्षता कांबळी यांनी…

Read More

करुळमध्ये मराठे कृषी कॉलेजचे एनएसएस शिबीर…

⚡कणकवली ता.१२-: करुळ गावामध्ये राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने विशेष श्रमसंस्कार शिबीर पार पडले.चार दिवसीय शिबिरात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, शाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद, शिवार फेरी, आधुनिक पद्धतीने भात लागवड तंत्रज्ञान, पटनाट्य, प्रगतशील शेतकरी भेट, गटचर्चा, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन, बंधारा बांधणे हे कार्यक्रम झाले. एनएसएस सेवा योजनेंतर्गत राबविलेल्या उपक्रमांविषयी…

Read More

पाडलोस रवळनाथ मंदिराच्या छप्पर दुरुस्ती कामास विनामोबदला काम करणाऱ्यांचा सन्मान…

⚡बांदा ता.१२-:पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील अनेकांचे योगदान, दातृत्व लाभले आहे. जवळपास 55 वर्षांनी छप्पराची दुरुस्ती करण्यात आली आहे. देवस्थानच्या उद्धारासाठी सर्वांचे सहकार्य महत्वपूर्ण असल्याचे मानकरी आनंद गावडे, नंदा गावडे यांनी सांगितले. पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनच्या वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मंदिराच्या छप्पर दुरुस्ती कामास विनामोबदला काम…

Read More

पाडलोस, दांडेलीत विजेचा लपंडाव…

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल : महेश कुबल यांचा आरोप.. ⚡बांदा ता.१२-:पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व विभागांनी सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला दिले होते. परंतु महावितरण विभाग यापासून अलिप्त राहिला असल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले. शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे पाडलोस, दांडेली भागात विजेचा खेळ खंडोबा झाला. वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांना शनिवारी पूर्ण रात्र विजेविना…

Read More

आंबोलीत श्री देवी सती महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार उत्साहात

आंबोली,ता.,जकातवाडी येथील देवी सती महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धाराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.काल पासून विविध धार्मिक कार्यक्रम विधी करण्यात आले.आज मूर्ती प्रतिष्ठापना,होमहवन करण्यात आला.सर्व धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद कार्यक्रम झाला. येथील लिंगेश्वर मंदिरात देखील सत्यनारायन महापूजा कार्यक्रम झाला.

Read More

कासार्डेत 14 मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव…

⚡कणकवली ता.१२-: बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे – कदमवाडी यांच्यावतीने तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव मंगळवार 14 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सकाळी 10 वा. धम्मध्वज वंदन, 10.15 वा. बुद्ध पूजापाठ, दु.12.30 वा. भोजन, सायं….

Read More
You cannot copy content of this page