स्टेअरिंग रॉड तुटल्याने मालवाहू ट्रकचा बांद्यात अपघात…

⚡बांदा ता.१९-: मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळला. सुदैवाने ट्रक वळवत असताना रॉड तुटल्या अन्यथा तो ट्रक तपासणी नाक्यात घुसला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. सदरचा अपघात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला. याबाबतची कोणतीच नोंद बांदा पोलीसात नव्हती.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाका आला असता अचानक गाडीच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला. त्यामुळे स्टेअरिंग लॉक झाले आणि गाडी दुभाजकावर आदळली. तपासणी नाका येथे महामार्गावर बॅरिगेटस लावल्याने ट्रक चालकाने गाडीचा वेग कमी केल्याने मोठा अनर्थ टळला जर ट्रक वेगात असता किंवा त्या समोर अन्य कोणतेही वाहन असते तर त्या वाहनाला सोबत घेऊन ट्रक तपासणी नाक्यात घुसला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. याबाबतची कोणतीही नोंद बांदा पोलीसात नव्हती.

You cannot copy content of this page