आपदग्रस्त वडापाव विक्रेत्याला शिवसेनेकडून मदत…

मंत्री दीपक केसरकर यांनी दिले दहा हजार रुपये..

⚡दोडामार्ग ता.१९-: येथील बाजारपेठेत वडापाव विक्री व्यवसाय करणाऱ्या केर निडलवाडी येथील संतोष गावडे यांच्या टपरीवर गुरुवारी (ता. १८) सायंकाळी फणसाचे झाड पडून नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत त्यांचा व्यवसायही बंद पडला होता.याची माहिती शिवसेनेच्या (शिंदे गट ) तालुका पदाधिकाऱ्यांना कळताच पुन्हा व्यवसाय उभारणीसाठी उमेद मिळावी म्हणून त्याला शिवसेनेकडून तातडीची रोख आर्थिक मदत मिळवून देण्यात आली.

पदाधिकाऱ्यांनी ही घटना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कानावर घालताच त्यांनी त्या युवकाला तातडीची मदत म्हणून रोख दहा हजार रुपये दिले. ही मदत शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शिवसेना पदाधिकारी रामदास मेस्त्री, संजय गवस, संदीप गवस, अभिजित गवस, कार्यालयप्रमुख गुरुदास सावंत यांनी श्री. गावडे यांच्याकडे सुपूर्द केली.

You cannot copy content of this page