कालच घंटानाद आंदोलन हे माझ्यासाठी “चॅलेंज” होतं…

बबन साळगावकर: यापुढेही सावंतवाडीच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार..

⚡सावंतवाडी ता.१९-: कालच घंटानाद आंदोलन हे माझ्यासाठी चॅलेंज होतं सर्व बाजूने शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा यांचा वापर करून सदर आंदोलन कसं होणार नाही या दृष्टीने शासनाच्या वतीने प्रयत्न होते, मात्र तरी देखील मी माझ आंदोलन हे यशस्वी करून दाखवलं अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकात असे नमूद केले की कालच्या आंदोलनाला आंदोलनात शिवसेना राष्ट्रवादी रिक्षा संघटना राजा शिवाजी चौक कार्यकर्ते यांनी मला साथ देत हे आंदोलन यशस्वी करण्यास मला हातभार लावला त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो तसेच यापुढे देखील सावंतवाडीच्या विविध प्रश्नांसाठी मी असाच लढत राहील असेही साळगावकर यावेळी बोलताना म्हणाले.

You cannot copy content of this page