शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त माजगाव मध्ये काजू कलमांचे वाटप…

सावंतवाडी
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगांव शाळेतील २१२ विद्यार्थ्यांना काजू कलमाचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी मुलाना मार्गदर्शन केले.

तसेच वाढदिवसानिमित्त दोन गटामध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. ५ वी ते ७ वी या गटामध्ये प्रथम क्रमांक गायत्री सावंत, व्दितिय क्रमांक राज सावंत, तृतिय क्रमाक त्रिशा शेटकर तसेच ८ वी ते १० वी या गटात प्रथम क्रमांक भक्ती सावंतभोसले, व्दितीय क्रमांक कु. वेदांत सावंत, तृतिय क्रमांक ज्ञानेश्वरी सावंत यांना पारितोषीक देण्यात आली त्याचप्रमाणे माजगाव गावातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळेतील मुलांना श्री दिपकभाई केसरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी संजय माजगावकर, श्रीम, सुनिता जाधव, श्री. पांडुरंग नाईक, श्री. रुपेश नाटेकर, श्री. मंदार सावत, श्री. सचिन सावत, श्री. सुनील रेडकर, श्री. संदेश सोनुलेकर, श्री. एकनाथ हळदणकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब चवरे, शिक्षक श्री, चंद्रशेखर सावंत, श्री. राज सावंत, श्री. सिद्धेश कानसे, श्री. रोहित केगले, प्राजक्ता गावडे, शितल गावडे, विविधा देसाई, मृणाली जाधव, श्री. गणेश केरकर, श्री. महादेव जाभळे आदी कार्यकर्ते व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page