चालकाचा ताबा सुटल्याने इनोवा कार पलटी…

मुंबई गोवा महामार्गवर इन्सुली कोठावळे बांध येथे घटना: अपघातात कोणालाही दुखापत नाही..

बांदा/प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गवर इन्सुली कोठावळे बांध येथे भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटल्याने इनोव्हा मोटार रस्त्याच्या बाजूला झाडीत जाऊन अपघातग्रस्त झाली. हा अपघात काल (गुरुवारी) रात्री उशिरा झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. सदरची इनोव्हा कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जात होती.

You cannot copy content of this page