कळसुलकर हायस्कूलचे विद्यार्थी छात्र सेनेतील प्रशिक्षणासाठी सज्ज…

या प्रशिक्षणासाठी हे विद्यार्थी सज्ज झाले असून पुढील तीन वर्ष या शालेय विद्यार्थ्यांना भारतीय सेनेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, सहाय्यक शिक्षिका एस. यु. बांदलकर, एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस, सर्व एनसीसी कॅडेट उपस्थित होते. यामध्ये १२ जेडब्ल्यू गर्ल्स कॅडेट व १५ जेडी बॉईज कॅडेट्स यांची ५८ एनसीसी महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ (सेना मेडल) यांच्या नेतृत्वाखाली सुभेदार देवेंद्र सिंग व हवालदार संतोष भटकर यांनी ही निवड केली. या प्रशिक्षणामध्ये महत्त्वाचे दहा दिवसांचे निवासी वार्षिक प्रशिक्षण शिबिर असते. येथे विद्यार्थ्यांना सेनेच्या कार्यवाहीचा जवळून अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होते. यातून विद्यार्थी आत्मनिर्भरता, स्वयंशिस्त शिकतात. सेनेच्या विविध कवायती तसेच रायफल शूटिंगचा प्रत्यक्ष अनुभव या शिबिरातून त्यांना मिळतो. शालेय जीवनामध्ये सेनेतील शिस्त अंगी यावी या उद्देशाने विद्यार्थी व पालक या उपक्रमात सहभागी होत असतात.

⚡सावंतवाडी ता.१९ सहदेव राऊळ -: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया आज पार पडली.

You cannot copy content of this page