संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा…
⚡कुडाळ ता.०१-: संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्रसिद्ध कवी,समीक्षक , प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या शुभहस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली…
