डॉ.प्रमोद वालावलकर नागरी सत्कार समितीचे योगदान..
कुडाळ : डॉ.प्रमोद वालावलकर नागरी सत्कार समितीच्या वतीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले.
डाॅ.वालावलकर यांनी अगदी नि:स्वार्थीपणे ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना चांगल्या प्रकारे अहोरात्र रुग्णसेवा दिली. त्यांच्या या कार्याबद्दल कुडाळवासिय नागरिकांच्या वतीने नुकताच नागरी सत्कार करण्यात आला. शुक्रवारी डाॅ.प्रमोद वालावलकर नागरी समितीच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले. यात सेमी फाॅलर बेड सोबत मॅट्रेस रेलींग, फोल्डिंग स्ट्रेचर आणि ऑक्सिजन फाइन ऍडजस्टमेंट व्हाॅल्व किट रुग्णालयाला देण्यात आले.
यावेळी संजय वेतुरेकर, ओंकार तेली, अभय शिरसाट, श्रीराम शिरसाट, संदीप साळसकर, विजय वालावलकर, नागेश बंगे, ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ.शुभम बोरवडे, श्रीमती प्रिया धुरी, रमाकांत आंगणे, अनन्या कांबळी, निखिल बावकर, शरद गावडे, भिकाजी पवार आदी उपस्थित होते.
