श्रावण येथील नृत्य स्पर्धेत श्रीधर पिंगुळकर आणि नंदिनी बिले विजेते…

⚡कुडाळ ता.०१-: परब मित्रमंडळ श्रावण (ता. मालवण) (मुंबई) आयोजित जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत श्रीधर पिंगुळकर पिंगुळी व नंदिनी बिले सावंतवाडी विजेत्या ठरल्या
परब मित्र मंडळ श्रावणच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच बुधवारी रात्री जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन श्रावण गाव प्रमुख उपसरपंच ग्रामपंचायत दुलाजी परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मान्यवरांचे उपस्थितीत पार पडले. यावेळी अध्यक्ष परब मित्र मंडळ श्रावण वरचीपरबवाडी (मुंबई), चंद्रकांत  परब सचिव संतोष परब खजिनदार
राजेंद्र परब  माजी सरपंच श्रावण,प्रशांत परब ,वशिष्ठ परब, चंद्रकांत परब, सुनिल परब, विकास परब, अजय परब , परब मित्रमंडळ, मुंबई-श्रावण (वरची परबवाडी) श्री देव लिंगेश्वर विकास मंडळ, श्रावणचे (खालची परबवाडी) पदाधिकारी ग्रामस्थ स्पर्धक आदी उपस्थित होते.
   या स्पर्धेत द्वितीय क्रमांक रॉनी जाधव देवगड व गुरुनाथ तुळसकर तुळस, तृतीय सानिका चव्हाण विजयदुर्ग व वैष्णवी बोडके सावंतवाडी, यांनी मिळवला. उत्तेजनार्थ दिश्यम परब, तुळस, प्रेयेश पवार कणकवली, उत्तेजनार्थ दुसरा सृष्टी पवार कणकवली व दुर्वा पावस्कर कुडाळ यांनी मिळवला. स्पर्धेचे परीक्षण कथक विशारद मृणाल सावंत व पत्रकार अजय सावंत यांनी केले. विजेत्यांना
प्रथम क्रमांक रोख रू. १११११/- व चषक,द्वितीय क्रमांक रोख रु.७७७७/- व चषक, तृतीय क्रमांक रोख रु.५५५५/- व चषक, उत्तेजनार्थ (दोन बक्षिसे) रोख रु.२२२२/ अशी भव्य रकमेची पारितोषिके व कै.ऋषिकेश रघुनाथ परब याचे स्मरणार्थ आकाश अजय परब यांजकडून भव्य चषक  देण्यात आला.
श्रीदेव लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पहाटेपासूनच भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच रात्री जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा झाल्या.  श्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भेट देऊन श्री चे दर्शन घेतले व नृत्य स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. सकाळी ७ वा. अभिषेक, सत्यनारायणाची महापूजा, महाआरती व तीर्थप्रसाद दुपारी महाप्रसाद दुपारी 3 ते ६ वा. महिला भगिनींसाठी हळदी कुंकू, सुस्वर भजने आदी कार्यक्रम झाले.
यावेळी बोलताना पत्रकार श्री सावंत म्हणाले कोणतीही स्पर्धा म्हटली की हार जीत असते. प्रत्येकाने रंगमंचाची प्रामाणिक सेवा केली पाहिजे. प्रत्येकात अपयश पचवण्याची ताकद असली पाहिजे, तरच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. स्पर्धकानी स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याकडे हजारो गाणी आहेत अनेक नृत्य प्रकार आहेत नेहमी नवीन काही तरी देण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धा होताना रसिकांचेसुद्धा मनोरंजन झाले पाहिजे.  आज जिल्ह्यातील विविध संस्था मंडळे यांच्यामुळे सर्व स्पर्धक कलावंतांना व्यासपीठ  मिळालेले आहे. या स्पर्धेतूनच आपण जिल्हाबाहेर आंतरराज्य राज्यस्तरीय स्पर्धामध्ये भाग घेऊन यशस्वी झालेलो आहोत. भविष्यात रंगमंचाची प्रामाणिक सेवा करून वाटचाल केल्यास यश दूर नाही, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते अजय परब यांनी केले.

You cannot copy content of this page