मा. आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कसाल येथील विकास कामांचे झाले भूमिपूजन…

⚡कुडाळ ता.०१-: माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिराचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु. व कसाल मर्तलवाडी ग्रा. मा.९७ हा रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी १४.२५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला होता. या कामांचे भूमिपूजन गुरुवारी वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान ठेकेदाराकडून दर्जेदार कामे करून घेण्याच्या सूचना वैभव नाईक यांनी केल्या.

         यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, बाळा कांदळकर, अवधूत मालणकर, डॉ. बालम, गणेश मेस्त्री, रमेश कदम, अरुण राणे, गिरीश मर्तल, नंदू आंबेरकर, बाळा परब, बाळा मर्तल, शंकर परब, बाबू गुरव, काका मर्तल, यशवंत परब, गिरीश मेस्त्री, स्वप्नील मोडक, अनिकेत पवार यांसह शिवसैनिक व कसाल ग्रामस्थ उपस्थित होते.
You cannot copy content of this page