⚡कुडाळ ता.०१-: संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्रसिद्ध कवी,समीक्षक , प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या शुभहस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. मराठी अभिमान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर यांनी मराठी भाषेची महती,अभिजात मराठीची पूर्वपिठीका सांगून मराठी भाषेसंदर्भात गाथा सप्तशती सारखा ग्रंथ आणि नाणेघाट येथील शिलालेख यांची माहिती त्यांनी दिली. मराठी भाषा आणि साहित्याच्या अत्यंत समृद्ध अशा परंपरेचा त्यांनी विस्तृत आढावा घेतला. कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेत संदर्भातील कार्याचाही त्यांनी विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितेविषयी आपले विचार मांडले. तसेच मराठी भाषा गौरव दिन आपण का साजरा करतो ही पार्श्वभूमी सांगितली. मराठी विभाग प्रमुख डॉ.शरयू आसोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
मराठी विभागाच्या वतीने वर्षभरामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील पुढील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. काव्यवाचन स्पर्धा – निवेदिता मेस्त्री -प्रथम क्रमांक (प्रथम वर्ष वाणिज्य), पूजा प्रभू- द्वितीय क्रमांक (प्रथम वर्ष वाणिज्य), शंकर जाधव-तृतीय क्रमांक (द्वितीय वर्ष कला) वक्तृत्व स्पर्धा – प्रेरणा कुबल-प्रथम क्रमांक (तृतीय वर्ष विज्ञान), साईवेद मालवणकर-द्वितीय क्रमांक ( द्वितीय वर्ष संगणकशास्त्र ), प्राजक्ता थोरात-तृतीय क्रमांक (द्वितीय वर्ष विज्ञान)
निबंध लेखन स्पर्धा – धनश्री मुंज- प्रथम क्रमांक (द्वितीय वर्ष व्यवस्थापनशास्त्र), गायत्री गावकर-द्वितीय क्रमांक(प्रथम वर्ष व्यवस्थापनशास्त्र), निनाद राऊळ-तृतीय क्रमांक (तृतीय वर्ष वाणिज्य). हस्ताक्षर स्पर्धा-कामाक्षी काळसेकर-प्रथम क्रमांक (प्रथम वर्ष व्यवस्थापनशास्त्र), अमिषा डिचोलकर-द्वितीय क्रमांक (तृतीय वर्ष संगणकशास्त्र), परवीन नदाफ-तृतीय क्रमांक(द्वितीय वर्ष संगणकशास्त्र ) तसेच उत्तम वाचक म्हणून प्रथम वर्ष कला शाखेमधून स्वप्निल कांदळगावकर द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये मधून सोहम कुडाळकर आणि तृतीय वर्ष कला शाखेमधून रसिका म्हापसेकर या विद्यार्थ्यांचाही ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांच्या स्मृतिस्थळांना मराठी विभागाच्या वतीने शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून भेट देण्यात आली. या स्मृतिस्थळांची माहिती देणारी रसिका म्हापसेकर हिने तयार केलेली क्षणचित्रफीत प्रसंगी उपस्थितांना दाखवण्यात आली. द्वितीय वर्ष संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान गीत सादर केले तर भूषण मांजरेकर (प्रथम वर्ष कला) यांने बासरीवादनाने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले. रसिका म्हापसेकर, विशाखा वाक्कर, मानसी भागवत आदींनी परिश्रम घेतले.पाहुण्यांचा परिचय व आभारप्रदर्शन संतोष वालावलकर यांनी केले. महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते.
संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा…
