मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ९ रोजी शालेय चित्रकला स्पर्धा…

⚡मालवण ता.०१-:
मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भंडारी एज्युकेशन सोसायटी, भंडारी कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांतर्फे भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथे रविवार, ९ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता मालवण तालुकास्तरीय शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा तीन गटांत होणार आहे. पहिला गट पहिली ते दुसरीसाठी ‘निसर्गचित्र, माझे आवडते कार्टून, माझा आवडता प्राणी किंवा पक्षी’ हे विषय आहेत. दुसरा गट तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पाण्याखालचे जग, मी पाहिलेला किल्ला, झाडे लावा, झाडे जगवा’ हे विषय आहेत. तिसरा गट पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मी पाहिलेला दशावतार, स्वच्छता ही सेवा, माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज’ हे विषय आहेत. तिन्ही गटांतील विजेत्यां प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १०००, ५००, ३०० रुपये व प्रत्येकी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धाप्रमुख माजी विद्यार्थी सौगंधराज बादेकर (९४२००२२८९०), शुभम मेस्त्री (९४०४९२०६३०) यांच्याशी संपर्क साधावा, स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page