जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीच घवघवीत यश…
⚡सावंतवाडी ता.१७-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन आंबोली येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये कु.निहारिका अमित मेस्त्री हिने 42 ते 48 किलो वजनी गटामध्ये प्रथम स्थान,कु. साची शिवनाथ टोपले हिने…
