Headlines

जि प सदस्य रुपेश पावसकर रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला…

⚡कुडाळ ता.१८-: नेरूर-देऊळवाडा जि प मतदार संघातून महायुतीचा पराभव करून निवडून आलेल्या रुपेश पावसकर यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची त्यांच्या केसरी येथील निवासस्थानी भेट घेतली. नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामांबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आपण विकास कामासाठी कटिबद्ध असल्याबाबतची ग्वाही श्री. पावसकर यांना दिली.

Read Full News

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर…

युवा नेते विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.१८- : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता मोपा विमानतळावर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. चव्हाण हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Read Full News

बांद्यात गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शविणाऱ्या गुढी पाडवा निमित्त बांदा येथे गुरुवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून उत्सवी वातावरणात नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे.रॅलीची सुरुवात श्री राम चौक, बांदा येथून होणार असून पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गडगेवाडी,…

Read Full News

सिंधुदुर्ग जि प विषय समिती सभापती निवडणूक २५ रोजी…

सिधुदुर्गनगरी ता १८ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सभापती यांच्या उपस्थितीत समाज कल्याण समिती १ पद ,महिला बालकल्यान समिती १ पद, विषय समिती सभापती २ पदे निश्चित करण्यात येणार आहेत. २५…

Read Full News

नेमळेतील युवकाची आजारपणाला कंटाळून आत्महत्या…

सावंतवाडी : नेमळे कुंभारवाडी येथीलगीतेश भिवा राऊळ या युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.गीतेश राऊळ हा नेमळे गावकर कुंभारवाडीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. गेल्या तीन ते चार वर्षापासून तो कंबरेच्या आजाराने त्रस्त होता. अलीकडेच त्याच्या कंबरेवर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, शस्त्रक्रिया करूनही बरे वाटत नसल्याने…

Read Full News

बांदा ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार…

⚡बांदा ता.१८-: बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच रत्नाकर आगलावे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सावंतवाडी पं. स. सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सरपंच प्रियांका नाईक, पं. स. सदस्या ऋतिका नाईक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,…

Read Full News

नेरूर येथे २८ मार्चला मोफत महाआरोग्य शिबीर…

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था आणि डॉ. कोरे हॉस्पिटल यांचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.१८-: केएलई विद्यापीठ संचलित डॉ.प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर (बेळगाव), बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, जि.प. आरोग्य विभाग व इतर विविध संस्थांच्या संयुक्त वतीने नेरूर (ता.कुडाळ) येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे शनिवार दि. २८ मार्च २०२६…

Read Full News

वेंगुर्ला शहरात रंगपंचमी मंगलमय वातावरणात व उत्साहात साजरी…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला शहरात बाजारपेठेसह आज बुधवारी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी युवा वर्गासह, युवती, बच्चे कंपनी, महिला भगिनीही विविध रंगात म्हावून निघाल्या होत्या.उद्या गुरुवारी गुढीपाडवा असल्याने शहरात एकच चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वेंगुर्ला बाजारपेठ, गाडीअड्डा नाका, कुबलवाडा, महाजनवाडा, हॉस्पिटलनाका, भटवाडी, राऊळवाडा व अन्य चौकाचौकात आदी विविधभागात सकाळपासून सायंकाळपर्यंत तरुणाई आबालवृद्धही रंगपंचमीत…

Read Full News

सावंतवाडीत विद्यार्थ्यांसाठी योगशिबिर संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१८-: फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्गच्या वतीने येथील पू. प्रा. शाळा क्र. ४ मध्ये आयोजित करण्यात आलेले योगशिबिर सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले. या योगशिबिरात विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, अभ्यासात एकाग्रता वाढावी तसेच मोबाईलच्या अति वापरापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात योगाभ्यास, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक व सराव घेण्यात…

Read Full News

मळगाव येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे ‘आदर्श गुढीपाडवा’ उपक्रम संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१८-: हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडव्याचे शास्त्रशुद्ध महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने मळगाव तेलीवाडी येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी येथील ‘दत्त प्रसाद स्वयंसाहाय्यता महिला समूहा’मध्ये ‘आदर्श गुढीपाडवा’ हा धार्मिक उपक्रम उत्साहात पार पडला.यावेळी ट्रस्टच्या कार्यकर्त्या सौ. पल्लवी पेडणेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन…

Read Full News

You cannot copy content of this page